ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोमध्ये बुधवारी 11 हजार 974 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 781 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात आतापर्यंत 12 लाख 05 हजार 229 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 11 हजार 655 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मेक्सिकोत 12.5 लाख रुग्णांपैकी 8 लाख 89 हजार 168 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 04 हजार 406 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 3,515 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिक जगात बाराव्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा चौथा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 30 लाख 86 हजार 510 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.