मंदिरात घेतले मातेचे दर्शन
सारा अली खानला सैर करायला आवडते हे आता तिच्या चाहत्यांच्या लक्षात आले असेलच. ती कधी मालदीवच्या समुद्रानजीक तर कधी काश्मीरमधील पर्वतांच्या सौंदर्यात हरवून जाते. सारा आता राजस्थानात पोहोचली आहे. साराने राजस्थानच्या मेवाडमधील नीमच माता मंदिर आणि आराध्य श्रीएकलिंगनाथजी मंदिरात जात दर्शन घेतले आहे. साराने मंदिर परिसतातील स्वतःचे एक छायाचित्र शेअर केले आहे.
साराला मंदिराच्या आत छायाचित्र काढून घ्यायचे होते, पण मंदिर व्यवस्थापनाची अनुमती न मिळाल्याने साराने मंदिराच्या बाहेर छायाचित्रे काढून घेतली आहेत. मंदिरात दर्शन घेतल्यावर सारा उदयपूरसाठी रवाना झाली. सारा काही दिवसांपूर्वीच काश्मीर येथे मित्रपरिवारासोबत गेली होती. काश्मीरमध्ये ट्रेकिंग अणि धार्मिक स्थळांना भेट दिल्यावर ती मुंबईत परतली होती. काश्मीरपूवीं तिने मालदीव आणि लडाखच्या ट्रिपचा आनंद घेतला होता.
अभिनेत्रीला यापूर्वी कूली नंबर 1 या चित्रपटात पाहिले गेले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. अभिनेत्री आता अतरंगी रे या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुष हे दिग्गज कलाकार आहेत.