एपीएमसी पोलिसांची कारवाई, चार वाहने जप्त
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरांमध्ये मोटारसायकली चोरणाऱया एका 25 वषीय अट्टल चोरटय़ाला अटक करण्यात आली आहे. एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली असून सुमारे 1 लाख रुपये किमतीची चार वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, डी. सी. सागर, एस. जी. कोगटोळी, नामदेव लमाणी, केंपण्णा दोडमनी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
गेल्या दोन महिन्यात मोटारसायकली चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांनी सतत प्रयत्न करूनही दुचाकी चोराचा थांगपत्ता लागत नाही, अशी परिस्थिती आहे. वाहनांच्या किमती वाढल्यामुळे चोरी प्रकरणातही वाढ झाली आहे. एपीएमसी पोलिसांनी एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून चोरीची वाहने जप्त केली असून त्याने कुठून वाहने चोरली, याचा तपास करण्यात येत आहे.