वृत्तसंस्था/ ऍडलेड
एटीपी टूरवरील येथे रविवारी झालेल्या ऍडलेड खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या गेल मोनफिल्सने एकेरीचे जेतेपद पटकाविले. मोनफिल्सने आतापर्यंत आपल्या टेनिस कारकीर्दीत एकेरीतील अकरा विजेतेपदे मिळविली आहेत.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात मोनफिल्सने रशियाच्या कॅचेनोव्हचा 6-4, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. एटीपीच्या मानांकन यादीत 35 वर्षीय मोनफिल्सला पहिल्या दहा टेनिसपटूंमध्ये स्थान मिळविता आलेले नाही.