प्रतिनिधी/गोडोली :
साताऱयात पैसे कमवायला आलेल्या मोना चॅरिटेबल इन्स्टिटयूट पालकांना शाळेचा प्रवेश निश्चित करण्यासाठी दि.29 मे अखेर पर्यंत ऑनलाईन शैक्षणिक फि भरण्याचा फतवा दि.6 मे रोजी काढला आहे.लॉकडाऊनच्या काळात चालू आणि आगामी वर्षाची शैक्षणिक फि ची सक्ती करू नये,असा शासनाचा आदेश तर जनजीवन पुर्वपदावर येईपर्यंत कोणत्याही शाळेने पालकांना शैक्षणिक फि बाबत मेसेजसुध्दा करू नये,असे लेखी कळवले आहे.तरी सुध्दा कोरोनाच्या धास्तीने घरी बसलेल्या पालकांना मोना स्कूलच्या प्रशासनाने फि सक्तीचा तगादा लावल्याने पालकांच्यात संताप उसळला आहे.तर काही जाणकारांनी मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर असताना पैशासाठी सामाजिक भान नसलेल्या मोना स्कूलवर कडक कारवाई करून नोंदणी रद्द करत साताऱयातून गाशा गुंडाळायला लावा,अशी मागणी केली आहे.
रोज रूग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाची चांगलीच दहशत वाढू लागली आहे. साताऱयाशी कोणतीच नाळ नसलेल्या एका शिक्षण सम्राटाने शैक्षणिक संकुल उभारून गच्चम फि आकारून प्रचंड कमाई केली आहे.याच समाटाची सदर बझार येथील असलेल्या मोना स्कूलच्या पालकांना दि.6 मे रोजी शाळेचा पुढील वर्षाच्या प्रवेश निश्चित करण्यासाठी दि.29 मे अखेर फि भरण्याचे मेसेज केले आहेत.जगाला कोरोनाच्या संकटापुढे आपले उदया काय होईल,याचीच शाश्वती नसताना पुढील वर्षाची फि भरण्याचा मेसेज पाठवून कोरोनापेक्षा जास्त भिती मोना स्कूलच्या प्रशासनाने घातली आहे.
राज्य शासनाने शिक्षण संस्थाचालकांना लॉकडाऊनच्या काळात चालू आणि पुढील वर्षाची शैक्षणिक फि भरण्याची सक्ती करून नये.लॉकडाऊन उठल्यावर फि जमा करण्याबाबत सूचनांची कार्यवाही करण्याचा आदेश 30 मार्च रोजी उपसचवि राजेंद्र पवार यांनी दिला आहे.तर सातारा जिल्हा परिषदेने 31 मार्च रोजी जिल्हयातील सर्व शाळांना जनजीवन पुर्वपदावर येईपर्यंत शाळेने पालकांना शैक्षणिक फि भरण्यासंदर्भांत मेसेज करू नयेत.फि भरण्याबाबत तगादा लावल्याचे निदर्शनास आल्यास शाळेविरूध्द कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल,असे लेखी पत्रातून सक्त सुचना दिल्या आहेत.तरीही मुजोर मोना स्कूल प्रशासनाने पालकांना फि भरण्याबाबत मेसेज करण्याचे धाडस केले आहे,याविरोधात आता प्रशासनाकडून काय कारवाई होणार की हात ओला करून प्रकरण रफादफा केले जाणार ,हे लवकरच समोर येईल.