मोहन मोरे चषक बीपीएल क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित मोहन मोरे चषक बीपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून मोहन मोरे संघाने के. आर. शेट्टी संघाचा चार गडय़ांनी तर ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआयने विश्रुत स्ट्रायकर्स संघाचा 9 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. नरेंद्र मांगोरे (मोहन मोरे), चेतन पांगीरे ऍक्सेस यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टी संघाने 20 षटकात 5 बाद 173 धावा केल्या. त्यात वैष्णव संघमित्रने 2 षटकार 6 चौकारासह 46 चेंडूत 73, प्रणय शेट्टीने 1 षटकार 8 चौकारासह 62 या दोघांनी अर्धशतक झळकाविले तर पार्थ पाटीलने 2 चौकारासह 12 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे नरेंद्र मांगोरेने 24 धावात 3, रवी पिल्लेने 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 19.1 षटकात 6 बाद 174 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. त्यात नरेंद्र मांगोरेने 2 षटकार 4 चौकारासह 49, संतोष सुळगेपाटीलने 1 षटकार 3 चौकारासह 31, नागेंद पाटील व ध्रुव नाईक यांनी प्रत्येकी 22 तर रवी पिल्लेने 1 षटकार 2 चौकारासह 19 धावा केल्या. के. आर. शेट्टी तर्फे स्वयम अप्पण्णावर, फरहान पाटील, ओंकार वेर्णेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात विश्रुत स्ट्रायकर संघाने 20 षटकात 9 बाद 137 धावा केल्या. त्यात अंगदराज हित्तमनीने 4 चौकारासह 31, सुनिल पाटीलने 1 षटकार 2 चौकारासह 18, मनोज पाटीलने 2 षटकारासह 17 तर राहुल नाईकने 3 चौकारासह 16 धावा केल्या. ऍक्सस डेव्हलपर्स सीसीआयतर्फे सुशांत कोवाडकरने 20 धावात 3, तर हार्दिक ओझा, ताहीर सराफ यांनी 28 धावात प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऍक्सस डेव्हलपर्स सीसीआयने 17.4 षटकात 1 बाद 138 धावा करून सामना 9 गडय़ांनी जिंकला. त्यात चेतन पांगिरेने 3 षटकार 3 चौकारासह 54 धावा करून अर्धशतक झळकाविले. तर रवी उकलीने 6 चौकारासह 41, माजिद मकानदारने 29 धावा केल्या. विश्रुततर्फे अंगदराज हित्तलमनीने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे संजय जाधव, शेखर हलतेकर, सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते सामनावीर नरेंद्र मांगुरे, इम्पॅक्ट खेळाडू वैष्णव संघमित्रा, उत्कृ÷ झेल पार्थ पाटील, सर्वाधिक षटकार रवी पिल्ले. तर दुसऱया सामन्यात समिर येळ्ळूरकर, गजानन जैनोजी, प्रसन्ना सुंठणकर यांच्या हस्ते सामनावीर चेतन पांगिरे, इम्पॅक्ट खेळाडू, सुशांत कोवाडकर, सर्वाधिक षटकार चेतन पांगिरे, उत्कृष्ठ झेल ज्ञानेश होनगेकर यांना चषक देवून गौरविले.
बुधवारचे सामने
मोहन मोरे इलेव्हन वि. सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना सकाळी 9 वाजता, s साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स वि. अर्जुन वीर श्रीसाई सोशल दु. 1 वाजता.