प्रतिनिधी / सोलापूर
चंद्रकला नगर नई जिंदगी येथील अल फुरकान एज्युकेशनल अंड वेल्फेअर ट्रस्ट संचलित अल फुरकान मदरसा तर्फे आज 30 ऑक्टोबर शुक्रवारी मोहम्मद पैगंबर(स.) जयंती निमित्त ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबवण्यात आला यावेळी मास्क व साबण वाटप चा कार्यक्रम देखील करण्यात आला.
चंद्रकला नगर परिसरात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत संस्थाध्यक्ष मौलाना हारिस दस्तगीर शेख यांनी कुटुंब प्रमुख व्यक्तींची व इतर लोकांची काय जबाबदारी आहे हे समजावून सांगितले ,तसेच येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांनासुद्धा मास्क व साबण देऊन त्यांच्यामध्ये माझ्या कुटुंबाची जबाबदारी याबद्दल जनजागृती केली. लोकांना स्वच्छतेचे नियम ,मास्क वापरण्याबाबत तसेच वारंवार हात धुणे बाबत जनजागृती करण्यात आली.
मोहम्मद पैगंबर साहेबांनी सांगितले की “तुमच्यातील प्रत्येक व्यक्ती जबाबदार नागरिक आहे आणि कयामत च्या दिवशी त्या व्यक्तिला त्याच्या जबाबदारी बद्दल विचारले जाईल “या हदीसच्या अनुषंगाने आपण एक जबाबदार नागरिक असून स्वतःच्या व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे आणि या व अशा अनेक जबाबदारीबद्दल कयामतच्या दिवशी अल्लाह आपल्याला विचारेल म्हणून ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान राबवण्यात आले असल्याचे संस्थाध्यक्ष मौलाना हारिस दस्तगीर शेख यांनी यावेळी सांगितले .
यावेळी दस्तगीर शेख ,हाफिज हुसेन ,वसीम शेख ,सुहेल गदवाल ,हाफिज परवेज, शाहरुख मुल्ला, हाफिज आरिफ हाफिज आमीर, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार पैगंबर शेख पोलीस हवालदार ताजुद्दीन शेख पोलीस कॉन्स्टेबल संतोष गुळवे आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मास्कचा वापर केला होता आणि शारीरिक अंतराचे पालन केले होते.