ऑनलाईन टीम / यंगून :
म्यानमारमध्ये लष्कराच्या बंडा विरोधात आज जवळपास दोन हजार कामगार आणि विद्यार्थी संघटनांनी यंगूनमध्ये भव्य मोर्चा काढत देशाच्या नेत्या आंग सान स्यू की यांना मुक्त करण्याची मागणी केली. यावेळी निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला.
म्यानमारमधील लष्कराने मागील 8 दिवसांपूर्वी लोकशाही सरकार उलथवून लावत एकहाती सत्ता हाती घेतली. त्यानंतर देशाच्या नेत्या आंग सान स्यू की, राष्ट्रपती विन मिन्ट यांसह काही महत्वाच्या नेत्यांना अटक केली. त्यामुळे मागील सोमवारपासून लष्करशाही विरोधात या देशातील जनता आक्रमक होत रस्त्यावर उतरत आहे.