नवी दिल्ली
गेल्या मार्चमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांनी समभागांमध्ये 2476 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याअंतर्गत 10 महिन्यात पहिल्यांदा इतकी निव्वळ स्वरुपाची गुंतवणूक करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
येणाऱया काळात समभागांमध्ये म्युच्युअल फंड कंपन्यांची गुंतवणूक स्थिर राहणार असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. याआधी फेब्रुवारीत म्युच्यअल फंड कंपन्यांकडून 16306 कोटी तर जानेवारीत 13032 कोटी रुपये काढण्यात आले होते.