ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
सन 2017 मध्ये रशियाने अमेरिकेच्या दूतावासांमध्ये काम करणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी केल्याने अमेरिकेने रशियातील दोन अमेरिकन दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला.
ट्रम्प प्रशासन पुर्व रशियातील व्लादिवस्तोक आणि येकाटेरिनबर्ग या दोन शहरातील अमेरिकन दूतावास बंद केली आहेत. त्यामुळे रशियात अमेरिकेचे केवळ मॉस्को येथील दूतावासाचे केंद्रच कार्यरत राहील. रशियातील नागरिकांना आता अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी मॉस्कोत यावे लागणार आहे.
अमेरिकेने सन 2018 मध्ये सेंट पीटसबर्ग येथील कौन्स्युलेट कार्यालयही बंद केले आहे.