प्रतिनिधी/ म्हसवड
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱया लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही तिसऱया लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचे मानले जात आहे. संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन गतीमान झाले असताना आम्ही म्हसवडकर ग्रुपतर्फे सुरू असलेल्या कोरोना सेंटरमध्ये दाखल असणाऱया लहान मुलांवर योग्य प्रकारे उपचार करावा अशी मागणी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. म्हसवडचे कोविड सेंटर जम्बो कोविड सेंटर करणार असे आश्वासन देवूनही अद्याप त्याबाबत ठोस पावले उचलली गेली नसल्यामुळे आम्ही म्हसवडकर ग्रुपने रुग्णांच्या प्रती आस्थेमुळे प्रत्यक्षात पालकमंत्र्यांच्या भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
तिसऱया लाटेसंबंधी शासनाच्या, प्रशासनाने सूचना देवूनही आरोग्य विभाग गाफील राहिले आहे. आम्ही म्हसवडकरच्या सदस्यांनी आम्ही म्हसवडकर कोव्हीड सेंटर, व सीसी येथे 27 लहान मुलांना दि. 8 व 9 जून रोजी दाखल करुन घेतले आहे. यांच्यावर योग्यप्रकारे उपचार सुरू व्हावेत या उद्देशाने आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या वतीने पालकमंत्री व जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांना निवेदन देवून जंबो कोव्हीड लवकर सुरु करावे व इंन्फ्लूएन्झाची लस मोफत मिळावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर म्हसवडमध्ये सहा महिन्यांच्या बालकांपासून 14 वर्षांपर्यंतच्या 27 मुलांना कोरोनाने गाठले आहे. त्यांच्या घरातील प्रौढ व्यक्ती बाधित आल्यामुळेच ही मुले बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व मुलांवर कोव्हीड सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत काकडे, डॉ. शेळके, व एमडी मेडिसन डॉ. रोहित मोडासे, सौ. मोडासे व डॉ. सिमरन मुल्ला यांच्या देखरेखेखाली उपचार सुरु आहेत. या सर्व बालकांना बालरोग तज्ञ हे रोज तपासणी करत असल्याची माहिती या कोव्हीड सेंटरचे प्रमुख डॉ. राजेंद्र मोडासे यांनी सांगितले.
दरम्यान, संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी तज्ञ डॉक्टर, औषधे, व लस मिळून मुलांच्यात कोणत्याही रोगाशी प्रतिकार करण्याची प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे मिळावीत या मागणीचे निवेदन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देवून म्हसवड येथे मंजूर असलेल्या जंबो कोव्हीडचे काम तातडीने सुरू करुन ते पूर्ण लवकर करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह ही उपस्थित होते तर जिल्हा परिषदेत अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते यांना जिल्हा परिषदेच्या वतीने लहान मुलांची औषधे, गोळ्यासह एन्फ्लूएंझा ही लहान मुलांची मोफत लस मिळावी या मागणीचे निवेदन आम्ही म्हसवडकर ग्रुपचे युवराज सुर्यवंशी, कैलास भोरे, एल. के. सरतापे, राहुल मंगरुळे, संजय टाकणे यांनी दिले आहे. लवकरात लवकर या मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.