वार्ताहर/ वरकुटे
म्हसवड वरुन पुणे मुंबई,फलटण या ठिकाणी जाण्यासाठी जवळचा मार्ग तसेच अनेकांचे कुलदॅवत असलेल्या म्हसवडच्या सिद्धनाथ व शिखर शिंगणापुर येथील इतिहासकालीन शंभुमहादेवाचे मंदिर यांना जोडणारा जवळचा व एकमेव मार्ग म्हणजे म्हसवड- शिंगणापुर हा राज्यमार्ग हा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये जा करीत असतात.
याचा म्हसवड ते वरकुटे हा भाग वाहतुकीस धोकादायक झाला असुन या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम मजुर आहे.त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवाशांमधुन होत आहे. हा रस्ता फलटण- शिंगणापुर-म्हसवड – शेनवडी याचा भाग असुन तो रस्ता दुपदरी करण्याचे काम मंजुर आहे. फलटण कडुन त्याच्या दुपदरीकरणाचे काम सुरुही झाले होते पण जावळच्या आसपास हे काम थांबवण्यात आले आहे.
याबाबत दहिवडी येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयाशी संपर्क केला असता त्यांनी सांगीतले की लवकरच हे काम सुरु करण्यात येणार आहे पण सांगून आठ महिने झाले पण काम सुरु करण्यात आले नाही. या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले असुन त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.हा रस्ता अरुंद असल्याने व साईडपट्टय़ा गेल्या दहा वर्षात भरल्या नसल्याने समोरून येणा-या वाहनाला रस्ता देताना अडचणी येत असतात त्यातुन अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होत असतात.
या सर्व बाबींचा विचार करुन बांधकाम विभागाने तातडीने म्हसवड – वरकुटे रस्त्याचे काम सुरु करावे अशी मागणी प्रवाशांमधुन होत आहे.