प्रतिनिधी /म्हापसा
येत्या 23 एप्रिल रोजी होणाऱया म्हापसा पालिका निवडणुकीसाठी एकूण 19 उमेदवारांनी आपले उमेदवरी अर्ज निर्वाचन अधिकारी मामू हेगे यांच्याकडे दाखल केले. दाखल करण्यात आलेल्या अर्जामध्ये वॉर्ड 1 -आनंद पुंडलिक भाईडकर, भूषण तुकाराम मयेकर, वॉर्ड 2- मंगेश गजानन हरमलकर, अल्पा आनंद भाईडकर, वॉर्ड 4- संगीता सुहास कोरगावकर, वॉर्ड नं. 5- किशोर शाबा राऊत. वॉर्ड 7- तारक मंगेश आरोलकर, वॉर्ड 8- विकास मंगेश आरोलकर, जॉन युरी लोबो, ज्ञानेश्वर बुधू वायंगणकर, वॉर्ड 11- अंकिता सुदेश हसोटीकर, वॉर्ड नं 14- सुभाष पंढरीनाथ भोबे, केदार उमेश कामत, वॉर्ड 16- विश्वास गजानन साळगावकर, वॉर्ड 18- उर्मिला निशिकांत येंडे, उज्ज्वला धनंजय शेटय़े, वॉर्ड 19- सुधीर रामा कांदोळकर, वॉर्ड 20- विरोझ आयुब खान, यानसी सेबिस्तान डिसोझा.