प्रतिनिधी/ मंडणगड
मंडणगडनजीक म्हाप्रळ पोलीस चेकनाक्यावर प्राण्याच्या मासांची वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली आहेत़ याप्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे दोन हजार किलो मांस जप्त केले आह़े हे मांस मुंबई येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर आले आह़े शुक्रवारी पहाटे 5च्या सुमारास ही कारवाई करण्यात आल़ी हे मांस गोवंशीय असल्याचा संशय पोलिसांनी वर्तविला आहे.
म्हाप्रळ पोलीस चेकनाक्यावर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे नाकाबंदी केली होत़ी यावेळी दोन वाहनांबाबत संशय निर्माण झाल्याने त्या वाहनांच्या चालकांची चौकशी करण्यात आल़ी चौकशीदरम्यान त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत़ त्यामुळे पोलिसांनी वाहनांची झडती घेतली असता गाडय़ांमध्ये प्राण्यांचे मांस असल्याचे समोर आल़े पोलिसांनी दोन्ही वाहनांसह चालकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. यामध्ये एका स्थानिकासह अन्य पाच संशयित मुंबईतील आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांविरुध्द प्राणी संरक्षक सुधारणा कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी अकिब शेख (चेंबूर, मुंबई), शाहिद युसूफ कुरेशी (गोवंडी मुंबई), मोहम्मद आदम कुरेशी (कुर्ला, मुंबई), इरफान कुरेशी (गोवंडी, मुंबई), मुजाहीद अब्दुल रहिमान शेख (गोवंडी, मुंबई) व मंडणगड येथील अजमल अखलाख पेटकर यांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक सुशांत वराळे यांच्या नियोजनाखाली मंडणगड पोलीस कर्मचाऱयांच्या पथकाने ही कारवाई केली. घडलेला प्रकार संवेदनशील असल्यामुळे यासंदर्भात दिवसभर चौकशीची प्रक्रिया चालू होत़ी कायदेशीर कार्यवाहीनंतर तपासणीत सापडलेले मांस नेमके कोणत्या प्राण्याचे आहे हे प्रमाणित होण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.