म्हैसूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान म्हैसूरमध्ये दर आठवड्याला ३५० मुले कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. गेल्या आठवड्यात, ४५० पेक्षा जास्त मुलांचे कोरोना चाचणी (०-१८ वर्षे) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एप्रिल २०२० पासून दर आठवड्यात सरासरी ३५० मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. १४ ते २० जून दरम्यान, ४७२ मुलांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे.
दरम्यान, बहुतेक कोरोना पॉझिटिव्ह असणारी मुले किशोरवयीन आहेत. महिला आणि बाल कल्याण अधिकारी यांनी एप्रिल २०२० ते मार्च२०२१ दरम्यान सुमारे १७ हजार मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले. १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या सर्व व्यक्तींना बालरोग प्रकरणे मानली जातात, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.