बेंगळूर : म्हैसूर महानगरपालिकेच्या महापौर रुक्मिणी मादेगौडा यांचे नगरसेवकपद अवैध ठरविण्यात आले होते. उच्च न्यायालयाने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आल्याचा निर्णय योग्यच असल्याचा निर्वाळा दिला होता. आता महापौरपद रिक्त असल्याने या जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 11 जून योजी महापालिकेच्या महापौरपदासाठी मतदान होणार आहे. प्रादेशिक आयुक्त जी. सी. प्रकाश यांच्याशी चर्चा केल्यानंतर पालिका आयुक्त शिल्पा नाग यांनी याविषयीची माहिती दिली. 24 फेब्रुवारी 2021 रोजी निजदच्या रुक्मिणी मादेगौडा यांची महापौरपदी निवड झाली होती. काँग्रेस-निजदने हातमिळवणी करून महापालिकेवर सत्ता प्रस्थापित केली होती. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेवेळी योग्य उत्पन्न दाखला सादर न केल्याने रुक्मिणी यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी याचिका काँग्रेसच्या नेत्या रजनी अण्णय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने रुक्मिणी यांचे नगरसेवकपद रद्द केले होते.
Previous Articleगोवा बोर्डाची बारावी परीक्षा रद्द
Next Article कोविड लॅबमधील कंत्राटी कर्मचाऱयांनाही भत्ता
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.