बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा ज्ये÷ नागरिक सोसायटीचे अध्यक्ष आणि मराठा समाज सुधारणा मंडळाचे सक्रिय सदस्य डी. पी. शिंदे यांनी आयसोलेशन सेंटरला आर्थिक मदत दिली आहे. आपल्या 85 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी 50 हजार रुपयांचा धनादेश समितीच्या पदाधिकाऱयांकडे दिला आहे.
कोरे गल्लीकडून 25 हजार रुपये
महाराष्ट्र एकीकरण समितीने सुरू केलेल्या कोरोना आयसोलेशन सेंटरला कोरे गल्ली शहापूर येथील गंगापुरी मठ ट्रस्ट व पंचमडळ, नागरिक यांच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली. एकूण 25 हजार रुपयांची मदत समितीच्या पदाधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी कोरे गल्लीचे पंच पुंडलिक मंडोळकर, पांडुरंग शिंदे, गजानन सावंत, शांताराम गावडोजी, सोमनाथ कुंडेकर, कल्लाप्पा हंडे, ऍड. गजानन जाधव, श्रीकांत जाधव, किरण पाटील, शांताराम मजूकर, गजानन शहापूरकर, रवी जाधव, माजी नगरसेवक मोहन चिगरे, शशिकांत शहापूरकर, सुनील बोकडे, मदन बामणे, महादेव पाटील, बाळू जोशी, सचिन तिळवेकर, इंद्रजित धामणेकर, सुधीर नेसरीकर आदी उपस्थित होते.