सध्या मराठी सेलिब्रिटींमध्ये साखरपुडा करण्याची, लग्नाचे निमंत्रण देण्याची लगबग सुरू आहे. सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या अनेक मालिकादेखील लग्नाच्या विषयाला वाहून घेतलेल्या आहेत. त्यामुळे मग मराठी टीव्ही जगतातील मोस्ट एलिजिबल बॅचरर्सनाही त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराची स्वप्नं पडली नाही तर नवलच. गेल्या आठवडय़ात भावाच्या लग्नात शेरवानी लूक केलेल्या यशोमानच्या लग्नाच्या अफवा पसरल्या. अखेर यशोमानने योग्य तो खुलासा केला पण तरीही त्याच्या चाहत्यांमध्ये असलेल्या तरुणींचा काय व्हायचा तो तीळपापड झालाच. फुलपाखरू, श्रीमंताघरची सून या मालिका आणि सिंगिंग स्टार या शोमुळे लोकप्रियतेच्या झोतात असलेल्या यशोमाननेही त्याला कशी बायको हवी हे सांगून टाकलं. त्याची हटके अपेक्षा ऐकून आता त्याच्या अपेक्षेत फिट बसणाऱया कित्येक मुली त्याच्यापर्यंत आपलं नाव पोहोचवायला सुरूवात करतील. एका शोमध्ये खऱया अयुष्यात कशी बायको हवी असं विचारले तेव्हा तो म्हणाला अजून तरी अशी कुणी मुलगी आयुष्यात नाहीय पण गालावर खळी असलेली कुणीतरी शोधावी लागेल. जसे माझे नाव यशोमान हे काहीसे वेगळे आहे. तशीच हटके, वेगळ्या नावाची मुलगी मला जोडीदार म्हणून आवडेल.
Previous Articleआठवडय़ानंतर बेपत्ता तरुण चीनकडून भारताच्या स्वाधीन
Next Article एका स्वप्नाची ‘घरवापसी’
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.