ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 28 मे रोजी ओदिशा आणि पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. यास चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली या दोन राज्यात आढावा बैठक होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्यांदा नरेंद्र मोदी भुवनेश्वरमध्ये जावून एक समीक्षा बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते बालासोर, भद्रक आणि पूरबा मोदिनिपुर या प्रभावित झालेल्या परिसराची पंतप्रधान हवाई पाहणी करणार आहेत.
यानंतर पश्चिम बंगालमध्ये देखील नरेंद्र मोदी एक समीक्षा बैठक घेतील. या बैठकीला राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.