ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
गेले काही दिवस कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटोवरुन केंद्र आणि राज्य शासन यांच्यात वाद वाढला असून काँग्रेसची सत्ता असणाऱ्या छत्तीसगड आणि झारखंड या दोन राज्यांच्या सरकारने लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो प्रमाणपत्र देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या मुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनसाठी देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रात पंतप्रधान मोदी यांच्या फोटो ऐवजी संबधीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो असणार आहे.
या बरोबर काँग्रेसची सत्ता असणाऱ्या छत्तीसगडने १८ ते ४४ वयोगटातील लोकांची लसीकरण नोंदणीसाठी एक अलग पोर्टल सुरु करण्यात येणार असल्याचे छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंग देव यांनी स्पष्ट केलं. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा अर्थिक भार संबधीत राज्यांवर पडणार असल्याने लसीकरण प्रमाणपत्र ही राज्यांनीच का छापू नयेत ? असा सवाल ही आरोग्यमंत्री देव यांनी केला आहे.
तसेच झारखंड येथील काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राकेश ठाकूर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे. ठाकूर यांनी असं म्हटलं आहे की, फोटो लावायचाच असेल तर कोरोना मृतांची जबाबदारी घेत मरण पावलेल्या लोकांच्या मृत्यूपत्रावरही मोदींचा फोटो छापायला पाहिजे. या मुळे केंद्र सरकारचा पंतप्रधान यांचा फोटो प्रमाणपत्रावर लावणार नसल्याने यावर भाजप काय प्रतिक्रीया देते का याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.