ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
नॉर्वे आणि जर्मनीच्या संशोधकांनी कोरोनावर केलेल्या संशोधनानुसार ‘A’ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. तर ‘O’ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना सर्वात कमी धोका आहे.
‘न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये नॉर्वे आणि जर्मनीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष प्रकाशित करण्यात आला आहे. संशोधकांनी कोरोना संशोधनावेळी वेगवेगळ्या रक्तगटांचा अभ्यास केला. त्यासाठी इटली आणि स्पेन मधील 1610 रुग्णांची निरीक्षणे त्यांनी नोंदवली. त्यानुसार ‘A’ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोना झाला तर त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्याची आवश्यकता ‘O’ रक्तगट असणाऱ्या रुग्णापेक्षा दुप्पट असते.
‘O’ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असला तरी त्यांना कोरोनाची बाधा होणार नाही असे नाही, त्यामुळे त्यांनीही काळजी घेणे आवश्यक आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.