मैत्रिणींनो, साडी कधीही आउट ऑफ फॅशन होत नाही. काही खास प्रसंगी साडय़ा नेसणं योग्य ठरतं. साडीमध्ये त्रीचं सौंदर्य खुलतं असं उगाच म्हटलं जात नाही. अत्यंत सुंदर आणि आकर्षक साडय़ा आपल्याला भुलवतात. साडय़ांचे असंख्य प्रकार आहेत. पण तुमच्या वॉर्डरोबमध्ये ठराविक प्रकारच्या साडय़ा असायला हव्यात.
- कॉटन साडी मस्ट हॅव आहे. कॉटनच्या साडीसोबत कॉंट्रास्ट प्रिंटेड ब्लाउज घालता येईल. कॉटनची साडी खूपच आरामदायी आहे. तसंच ही साडी खूपच सुंदर दिसते. कॉटन साडी व्हर्सटाईलही आहे. कॉटनच्या साडीवर सिल्व्हर ज्वेलरी घालता येईल.
- तुमच्याकडे एखादी पारंपरिक सिल्क साडी असायला हवी. कांचीपुरम, बनारसी, चंदेरी यापैकी कोणत्याही साडीची निवड तुम्ही करू शकता. सिल्क साडीमुळे तुम्हाला रॉयल लूक मिळेल. खास समारंभात सिल्कची साडी शोभून दिसते.
- उन्हाळ्यात प्रिंटेड साडी शोभून दिसेल. जॉर्जेट किंवा शिफॉन मटेरियलची प्रिंटेड साडी घ्या. या प्रिंटेड साडय़ा दररोज कॅरी करता येतील. वजनाला हलक्या असणार्या या साडय़ा दिसतातही खूप छान.
- बॉलिवूड सेलेब्ज पेस्टल साडी कॅरी करताना दिसतात. या साडीवर मोत्याची माळ किंवा दागिने शोभून दिसतात. संध्याकाळच्या पार्टीला या साडय़ा शोभून दिसतात. त्यामुळे तुम्हीही एखादी पेस्टल साडी विकत घ्या.
- सध्या सीक्वेन्स वर्क वाल्या साडय़ांचा ट्रेंड आहे. सीक्वेन्स साडय़ा वजनाला हलक्या असतात. या साडय़ा खूप सुंदर दिसतात. एखाद्या स्टायलिश ब्लाउजसह ही साडी कॅरी करा.
- थोडं ट्रेंडी दिसायचं असेल तर लेहंगा साडी कॅरी करा. ही साडी खूप आकर्षक दिसते. या साडीवर स्टेटमेंट ज्वेलरी छान दिसेल.
- साडी गाऊनही बराच लोकप्रिय ठरतो आहे. इंडो-वेस्टर्न लूकसाठी तुम्ही ही साडी नेसू शकता. झटपट तयार व्हायचं असेल तर साडी गाऊन मस्ट आहे.