वृत्तसंस्था/ कटक
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या ओदिशा खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात नवोदित 14 वर्षीय महिला बॅडमिंटनपटू युनाती हुडाने मालविका बनसोडला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
शनिवारी येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात हुडाने 50 मिनिटाच्या कालावधीत मालविका बनसोडचा 24-22, 24-22 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसऱया उपांत्य सामन्यात स्मित तोशिनवालने पाचव्या मानांकित अस्मिता चलिहाचा तासभराच्या कालावधीत 21-19, 10-21, 21-17 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले आता हुडा व तोशिनवाल यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. मिश्र दुहेरीत भारताच्या एम. आर अर्जुन आणि ट्रेसा जॉलीने अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना यादव व पांडा यांचा 21-9, 21-9 असा पराभव केला.