ऑनलाईन टीम / मिलान :
मागील आठवड्यापासून युरोपात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. एका आठवड्यातील बाधितांचा आकडा 10 लाखांपर्यंत पोहचल्याने युरोपियन देशांची चिंता वाढली आहे.
युरोपमधील ब्रिटन, डेन्मार्क, इटली, आयर्लंड, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स, इस्त्राईल, स्पेन आणि पोर्तुगालसह 27 देशात ब्रिटिश कोरोना वेगाने फैलावत आहे. लॅबमधील तपासणीत स्पष्ट झाले आहे की, हा ब्रिटिश स्ट्रेनचाच धोकादायक प्रकार आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनाही यावर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, युरोपात आतापर्यंत 3 कोटी 50 लाख 03 हजार 055 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 2 कोटी 45 लाख 83 हजार 245 रुग्ण बरे झाले असून, 95 लाख 86 हजार 482 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 8 लाख 33 हजार 328 रुग्ण दगावले आहेत.