ऑनलाईन टीम / अबू धाबी :
कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी देशातील लोकसंख्येपेक्षा अधिक चाचण्या करून यूएईने जागतिक रेकॉर्ड केले आहे. लोकसंख्येपेक्षा अधिक चाचण्या करणारा हा जगातील पहिला देश आहे.
यूएईची लोकसंख्या 99 लाख 22 हजार 644 असून, यूएईने आतापर्यंत 1 कोटी 5 लाख 50 हजार 053 कोरोना चाचण्या केल्या आहेत. त्यामधील 1 लाख 09 हजार 929 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 93 हजार 479 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 9012 रुग्ण उपचार घेत असून, 438 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, चीनमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक 16 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेत आतापर्यंत 11 कोटी तर भारतात 8 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.