ऑनलाईन टिम / लखनऊ :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉक डाऊनची घोषणा केली आहे. या लॉक डाऊन मुळे अनेक उद्योग धंदे बंद आहेत. त्यामुळे मजुरांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मजुरांच्या मदतीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत योगी सरकारने उत्तर प्रदेशातील २७ लाख मनरेगा मजूरांच्या खात्यात एकूण ६११ कोटी रुपये जमा केले आहेत.
या बद्दल बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, मनरेगा श्रम विभागात १ कोटी ६५ लाख ३१ हजार मजूरांची नोंद आहे. या सर्व मजूरांना एक महिन्याचे धान्य मोफत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये २० किलो गहू व १५ किलो तांदूळ मोफत दिले जातील.
तसेच निवृत्त वेतनाचा लाभ घेणाऱ्या ८३ लाखांपेक्षा अधिक निवृत्ती वेतन धारकांना २ महिन्यांचे निवृत्ती वेतन आगाऊ देण्यात येणार आहे. असेही ते यावेळी म्हणाले.