प्रतिनिधी / बेळगाव
रंगोली या देशभरात फॅशन प्रदर्शने आयोजित करणाऱया समूहातर्फे बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या रंगोली स्पेशल फॅशन व लाईफ स्टाईल प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. मराठा मंदिरमध्ये तीन दिवस हे प्रदर्शन असून गुरुवार दि. 11 रोजी समारोप होणार आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात बेळगावकरांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेऊन पुन्हा दुसऱयांदा हे प्रदर्शन बेळगावात मराठा मंदिरमध्ये भरविले आहे.
रंगोली एक अग्रणी फॅशन व लाईफ स्टाईल प्रदर्शन असून अल्पावधीतच फॅशनप्रेमींच्या मनात रंगोलीने स्थान मिळविले आहे. प्रदर्शनात देशभरातील प्रसिद्ध स्टॉलधारक सहभागी झाले आहेत. लग्नसराईसाठी लागणारे स्पेशल कलेक्शन येथे उपलब्ध आहे.
महिलांसाठी सणासुदीच्या काळात लागणारे कपडे, लग्नसराईचे कपडे, ज्वेलरी, बेडसीट, फुटवेअर, हेअर एक्सेसरीज, डिझाईन कृती, साडय़ा, इंडोवेस्टर्न आणि होम डेकोअरचे सर्व साहित्य उपलब्ध आहे. या प्रदर्शनात पुणे, मुंबई, कोलकाता, नागपूर, दिल्ली, जयपूर, इंदोर, बनारस, चंदिगड, चेन्नई, सुरत, कानपूर, अहमदाबाद, जम्मू, पंजाब, कोईमतूर, लखनऊ, रायपूर येथील डिझाईनर्स सहभागी झाले आहेत.
प्रदर्शनात जवळपास 80 स्टॉल्स आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यादृष्टीने कपडे व एक्सेसरीज उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आयोजकांनी सांगितले.