- शिवसैनिकांसह राणे समर्थक देखील आक्रमक
- कणकवली, मालवण, वेंगुर्ले येथे शिवसैनिक रस्त्यावर उतरले
- तर कुडाळात राणे समर्थकांचा सडेतोड उत्तर देण्याचा इशारा
- राणेंच्या विरोधात घोषणा आणि प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन
- कुडाळात शिवसेनेच्या विरोधात राणे समर्थकांच्या घोषणा
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री राणेंच्या विरोधात करण्यात आलेल्या कारवाई नंतर राणेंचा बाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱया सिंधुदुर्ग जिल्हय़ात शिवसैनिकां बरोबरच राणे समर्थकांनी देखील जोरदार निदर्शने केली.
नाशिक येथून झालेल्या तक्रारीनुसार राणेंना अटक केल्यानंतर राणेंचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणाऱया सिंधुदुर्गात देखील शिवसेना प्रचंड आक्रमक झाली आहे. मालवणात त्याचप्रमाणे वेंगुर्ले, कणकवलीतही शिवसैनिकांनी रस्त्यावर रेऊन राणेंचा निषेध करत राणेंच्या अटकेची मागणी केली. काही ठिकाणी राणेंच्या पुतळ्याचेही दहन करण्यात आले.
रत्नागिरीमध्ये भाजपची जन आशिर्वाद यात्रा रोखून राणेंना ताब्यात घेताच सिंधुदुर्गात राणे समर्थक व बिजेपी कार्यकर्त्यांनी देखील जोरदार निदर्शने सुरु केली. कुडाळ शहरात राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर येत शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राणे हे राष्ट्रीय स्तरावरचे नेते असून त्यांच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी त्यांस सडेतोड उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. रत्नागिरी प्रमाणे सिंधुदुर्गात जन आशिर्वाद यात्रा रोखायचा प्रयत्न झाल्यास जशासतसे उत्तर देण्यात येईल असा इशारा राणे समर्थकांनी दिला आहे.