प्रतिनिधी / रत्नागिरी
चिपळूण येथील 54 वर्षे वयाच्या महिला रुग्णाचा रविवारी कोव्हीडने मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूंची संख्या 25 झाली आहे. दरम्यांन 6 नवे रुग्ण सापडल्याने बधितांची संख्या 560 झाली आहे, तर 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मृत्यू झालेली महिला चिपळून निवळी येथील असून ती 19 जून रोजी मुंबईतुन आली होती. बेशुध्द स्थितीत दवाखान्यात दाखल करण्यात आली होती. 20 जून रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर महिलेस मधुमहे आणि मोठ्या प्रमाणावर किडनी इन्फेक्शन होते. दाखल झाल्यापासून सदर महिला बेशुध्दावस्थेतच होती तिच्यावर आयसीयू मध्ये उपचार होती व ती व्हेंटिलेटरवर होती.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले यामुळे एकूण पॉझिटिव्ह रु्ग्णांची संख्या 560 झाली आहे. कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण, रत्नागिरी येथून 04 व कोव्हीड केअर सेंटर कोकण कृषि विद्यापीठ दापोली 3 रुग्ण, कोव्हीड केअर सेंटर घरडा 03 रुग्ण अशा 10 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 430 झाली आहे.
काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 06 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे
1) साळवी स्टॉप ता.रत्नागिरी
२) मु.पो.कोंडगे ता. लांजा
3) मु.पो. देवरुख ता. संगमेश्वर
४) गुहागर नाका ता.चिपळूण
५) मु.पो. पन्हळे ता. लांजा
६) कामथे ता. चिपळूण
सध्या रुग्णालयात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 111 आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे.
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 560
बरे झालेले – 430
मृत्यू – 25
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 110 + 1