प्रतिनिधी / रत्नागिरी
अखेर आज कोरोना लसीची प्रतीक्षा संपली आणि प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरणाला देशात ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातही लसीकरणाला सुरुवात झाली असून सर्वप्रथम तीन महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविड लस घेतल्यानंतर सर्व कर्मचारी स्टाफला ही लस देण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात १६ हजार ३३० कोरोना डोस उपलब्ध झाले आहेत. पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही कोरोना लस देण्यात येणार आहे. पाच सेंटरवर प्रत्येकी १०० कर्मचाऱ्यांना लस देणार. या कार्यक्रमाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. यावेळी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात आमदार राजन साळवी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलापूरकर, आरोग्य सभापती बाबू म्हाप, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते.
दर दोन तासाला २५ जणांना लस देण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ५ सेंटरवर लसीकरण सुरू. प्रत्येक सेंटरवर १०० आरोग्य स्टाफला लस देण्यात येईल. मुळात पहिल्या दिवशी लस घेण्यात काही कर्मचाऱ्यांची उदासीनता ही दिसून आली मात्र सुरुवातीला २५ कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लस घेतल्यानंतर या लसीकरणाला प्रतिसाद मिळाला. सर्व नियमांची अंमलबजावणी करून नियोजनबद्ध रित्या पहिल्या दिवशी शासकीय रुग्णालयात लसीकरण पार पडले. लसीकरणानंतर प्रत्येक स्टाफला देखरेखी ठेवण्यात आले होते.
कोविड लसीकरणाच्या शुभारंभा आधीच Co-win ॲप डाऊन झाल्याने लसीकरण केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांची संपर्कासाठी तारांबळ उडाली होती. लस घेणाऱ्यांना मोबाईलद्वारे संपर्क करण्यात येत होते मात्र अचानक हे ॲप डाऊन झाल्याने थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असे असले तरी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या टीमने ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करत लसीकरण सुरळीत सुरू केले.
महिला वैद्यकीय अधिकारी ठरले कोरोना लसीचे पहिले तीन मानकरी
शनिवारी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रथम १०० कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यामध्ये कोविड लसीचा पहिला डोस अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सई धुरी यांना देण्यात आला. त्यानंतर डॉ. मंगला चव्हाण (भुलतज्ञ),