स्थलांतराच्या सूचना, तीन घरांना धोका कायम
मौजेदापोली / वार्ताहर
दापोलीत सोमवारी सुरु झालेल्या पावसाने मंगळवार पहाटे पर्यंत जोर धरल्याने दापोली आसूदबाग येथील सातारकरवाडी ब येथील मुख्य रस्त्यावर दरड कोसळून अडीच फुटावर असलेल्या तीन कुटूंबाच्या घरांना भेगा जाऊन धोका निर्माण झाला आहे. मात्र याविषयी वेळीच कळवून देखील तहसीलदार वेळेत न आल्याने संताप ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरड कोसल्यानंतर तेथील जमिनीला भेगा गेल्या. तसेच अडीच फुटावर कल्पेश माने, संतोष माने, हरिश्चंद्र माने यांच्या तीन घरांच्या जमिनीसह घराच्या भिंतींना भेगा गेल्या आहेत. त्यामुळे घरांना धोका निर्माण झाल्याने सदर कुटुंबाना स्थलांतर होण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत. मात्र स्थलांतर कुठे व्हायचे हा प्रश्न या तीन कुटुंबाना पडला आहे.