प्रतिनिधी / रत्नागिरी
ग्रामीण भागातील होतकरू तरुण या ‘उमेद’ अभियानात जीव लावून काम करत आहेत. आज अभियान चांगल्या फलनिष्पतीकडे वाटचाल करत असताना सीएससी या त्रयस्थ संस्थेला वार्षिक 30 ते 40 कोटी खर्च वाढवून शासन अभियान देत आहे. असा निर्णय कॅबिनेट बैठकीशिवाय झालेल्या निर्णयात निश्चित पुढाकार घेऊन मदत करण्यासाठी विधान परिषद उपाध्यक्ष डॉ. निलम गोऱ्हे पुढे सरसावल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व गरीब बचत गटातील महिला, समुदाय संसाधक व्यक्ती यांच्यासाठी पुढील निर्णयासाठी मुख्यमंत्री यांच्याशी संवाद करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
उमेद’मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत 27 नोव्हेंबर रोजी विधान परिषद महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. निलम गोऱ्हे यांनी दूरदृष प्रणालीद्वारे बैठक घेतली. उमेद विभागाच्या कंत्राटी कर्मचारी व महिलांचे सीएससी या खासगी संस्थेकडे वर्ग करणे धोरण व प्रश्न समजून घेण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य कल्याणकारी मंडळ पदाधिकारी याच्याशी बैठकी दरम्यान डॉ. निलम गोऱ्हे यांनी उमेदच्या मागील दोन महिन्यांतील लढा, संपूर्ण घडामोडी, कंत्राटी कर्मचाऱयांच्या संघर्षाची माहिती जाणून घेतली व खेद व्यक्त केला. शासनच्या एका उत्कृष्ट योजनेचे त्रयस्थ संस्थेचा हस्तक्षेप का होत आहे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार व विरोधी पक्षनेते या सर्वांशी पत्रव्यवहार करुन या बाबत माहिती जाणून घेतली जाईल. तसेच केंद्र शासनालाही पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. सीएससी ई कोविडबाबत माहिती जाणून घेण्यात येईल. या संस्थेला वार्षिक 30 ते 40 कोटी खर्च वाढवून शासन का त्रयस्थ संस्थेला अभियान देत आहे. या विषयी झालेला निर्णय व कॅबिनेट बैठकीशिवाय कसा झाला. या बाबत ही डॉ. गोऱ्हे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातील सर्व गरीब बचत गटातील महिला, समुदाय संसाधक व्यक्ती यांच्यासाठी मी स्वत पुढाकार घेऊन पुढील निर्णयासाठी मुख्यमंत्री यांच्याशी संवाद करण्याचे आश्वासनही डॉ. गोऱ्हे यांनी दिले. त्यामुळे उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा आधार दिला. या बैठकीस उमेद महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष चेतना लाटकर, सचिव डॉ बलवीर मुंडे, उपाध्यक्ष नीरज नखाते, सुधीर खुजे व कोषाध्यक्ष स्वप्नील शिर्के आदींनी आपले मत नोंदवले. यासाठी डॉ. निलम गोऱहे यांचे स्वीय सहाय्यक योगेश जाधव व सचिव रवींद्र खेबुडकर यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.