रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरी एसटी बसस्थानकाचे काम गेली चार वर्ष रखडले आहे. हे काम त्वरित पूर्ण व्हावे आणि झोपलेल्या लोकप्रतिनिधी, शासनाला जाग येण्यासाठी व शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपाने शक्तीप्रदर्शन करत लाक्षणिक उपोषण केले.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले. या वेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली. फक्त घोषणा करणाऱ्या मंत्र्यांच्या नावाने या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. उपोषणात अॅड. पटवर्धन यांच्यासमवेत सचिन वहाळकर, शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, अॅड. विलास पाटणे, डॉ. संतोष बेडेकर, नगरसेवक राजू तोडणकर, ऐश्वर्या जठार व भाजपचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.