कोरोना पॉझिटिव्ह संख्या शुन्यावर
प्रतिनिधी/रत्नागिरी
सहा
महिन्यांचा चिमुकला आपल्या
आईच्या कडेवर बसून लिफ्टमधून
बाहेर येताच रुग्णालयातील
डॉक्टर, नर्सेस,
वैद्यकीय सहाय्यक
स्टाफ आणि इतरांनी टाळयांचा
गजर करीत या बालकाच्या
कोरोनामुक्तीचे स्वागत केले.
15 दिवसांच्या उपचार
व तपासणीनंतर साखरतर येथील
या बालकाचा कोरोनावरील विजय
हा संपूर्ण यंत्रणेचा विजय
ठरला आहे.
वेगवेगळया
पातळयांवर वेगवेगळी कामे
करीत कोरोना योध्दे यात उतरले.
देशपातळीवर टाळेबंदी
अर्थात लॉकडाऊनची घोषण करण्यात
आली यानंतर सर्वच ठिकाणांवर
संचारबंदी आणि कोरोना
प्रतिबंधात्मक उपाय योजन्याला
प्रारंभ झाला. साखरतर
हे शहरनजिकचे गाव या गावात
कोणताही प्रवास इतिहास नसताना
एका महिलेस कोरोना झाल्याचे
निदर्शनास आले. त्यापाठोपाठ
त्याच घरातील अन्य एका महिलेसह
या सहा महिन्यांच्या चिमुकल्यास
देखील कोरोना बाधा झाली
होती.
येथील
जिल्हा सामान्य रुग्णालयात
या रुग्णांवर उपचार करण्यात
आले. रुग्णालयाचे
डॉ. प्रकाश जांभुळकर
यांची कोरोना उपचारासाठी
नियुक्ती करण्यात आली.
त्यांनी व इतर डॉक्टर
आणि नर्स यांनी घेतलेल्या
परिश्रमामुळे कोरोना रुग्णांवर
योग्य उपचार होवून त बरे झाले
आहेत असे जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ. अशोक बोल्डे
यांनी सांगितले.
पालकमंत्री
ॲङ अनिल परब, उच्च
व तंत्रशिक्षण मंत्री उदय
सामंत यांच्या सोबत जिल्हाधिकारी
लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या
मार्गदर्शनात जिल्हयात कोरोना
प्रतिबंधाचे विविध उपाय
योजण्यात आले आहे. पोलिस
अधिक्षक डॉ. प्रवीण
मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस दलाने जिल्हयाच्या
सर्व सिमा बंद ठेवल्या.आजवर
सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे
हे शक्य झाले आहे. मात्र
हे कायम राखण्यासाठी सर्वांनी
असेच सहकार्य करावे या शब्दात
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण
मिश्रा यांनी सर्वांचे आभार
मानले.