प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयातही आता कोरोनाचा शिरकाव होऊ लागला आहे. मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रमुख विभागात काम करणार्या एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असून हा संपूर्ण विभाग क्वॉरंन्टाईन करण्यात आला आहे.
तसेच शहर पोलिस स्थानकामधील एका महिला कर्मचारीचा देखील रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असून तिच्या संपर्कात आल्याने पोलिस स्थानकातील सर्वांचे स्वॅब तपासणीकरीता घेण्यात येणार आहेत.