प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हयात रविवारी सायंकाळपासूनच्या 24 तासांत 52 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीतांची एकूण संख्या 1262 झाली आहे. सोमवारी 23 जण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 749 झाली आहे. रत्नागिरी व चिपळुणात खासगी रूग्णालयांमध्ये कोरोनाचा मोठा प्रमाणावर फैलाव झाल्याचे दिसून येत आहे.
नव्या रूग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी येथील 5, घरडा, खेड 22, उपजिल्हा रुग्णालय, कामथे 14, दापोली 5 व लांजातील 5 जणांचा समावेश आहे. घरडा कंपनीतील रूग्णांची एकूण संख्या 132 झाली आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांनाही आता मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या रूग्णांमध्ये रत्नागिरी व चिपळूण येथील खासगी रूग्णालयातील नर्स, डॉक्टर व अन्य कर्मचार्यांचा समावेश आहे.
सोमवारी 23 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 749 झाली आहे. सोमवारी डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये कोव्हीड केअर सेंटर पेढांबे 7, कोव्हीड केअर सेंटर देवधे लांजा 5, पाचल रायपाटण 4 आणि समाजकल्याण रत्नागिरी मधील 7 जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला असून उपचाराखाली असलेल्यांची संख्या 472 आहे.
रत्नागिरी तालुक्यात फणसोप सडा परिसर, मिरकरवाडा, पोलीस वसाहत, वाटद, खंडाळा, आशीर्वाद अर्पाटमेंट, माळनाका, नाचणे नरहर वसाहत, नर्सिंग हॉस्टेल, मयुरेश्वर कॉम्प्लेक्स, आयटीआय हॉस्टेल समोर, जुवे, जयगड, कुणबीवाडी कसोप, भगवतीनगर भूतेवाडी, शेटयेवाडी शिरगाव, सनराईझ रसिडेन्सी, आझादनगर, मजगाव रोड ही क्षेत्रे कोरोना विषाणूबाधित घोषित करण्यात आली आहेत.
434 अहवाल पलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्पत 14 हजार 158 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील 1262 अहवाल पॉजिटीव्ह तर 12 हजार 462 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 434 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहेत.