प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील महत्वाचे गाव असणाऱ्या पाजपंढरी येथील बससेवा तब्बल ७ महिन्यांनी सोमवार पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
दापोली पाजपंढरी बससेवा कोरोना काळात बंद करण्यात आली होती यामुळे कोळीबांधव, आजारी नागरीक, वृद्ध नागरिक, विद्यार्थी, महिला यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत. यामुळे प्रतिष्ठित नागरिक जरूर कोंडविलकर व भास्कर दोरकुळकर यांनी दापोली आगारात जाऊन आगारप्रमुख यांची भेट घेतली व त्यांना पाजपंढरी बस सुरू करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यांच्या विनंती नुसार सोमवारपासून दापोली पाजपंढरी बस पुन्हा सुरु करण्यात आली आहे ही बस सकाळी सव्वा अकरा वाजता सोडण्यात आली याबद्दल त्यांचे परिसरात आभार व्यक्त होत आहेत.