रत्नगिरी/प्रतिनिधी
रत्नागिरी शहरात उद्यमनगर येथील महिला रुग्णालयात 100 खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता महिला रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून वापरण्यात येणार आहे. याठिकाणी नवीन कर्मचारी भरतीदेखील सुरु झाल्याची माहिती ही सामंत यांनी दिली. यासाठी खाजगी डॉक्टरांचे सहकार्य सुद्दा घेण्यात येणार आहे.