दापोली – प्रतिनिधी:
दापोली तालुक्यातील सोवेली गावातील एका 26 वर्षीय महिलेने आपल्या एक व तीन वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.
सदर घटना समजताच दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमागील आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.