मुंबई
रत्ने आणि दागिन्यांची निर्यात ही आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 25.71 टक्क्यांनी घसरुन 1,85,952.34 कोटी रुपयांवर राहिल्याची माहिती उद्योग संघटना रत्न आणि दागिने निर्यात संवर्धन परिषद (जीजेईपीसी) यांनी दिली आहे. कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे निर्माण झालेल्या अडचणीमुळे निर्यातीत घसरण झाल्याची नोंद केली आहे. या अगोदरच्या आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये रत्न आणि दागिन्यांची निर्यात ही 2,50,319.89 कोटीवर राहिल्याची नोंद केली आहे.
जीजेईपीसीचे अध्यक्ष कोलिन शाह यांच्या माहितीनुसार 2020-21 च्या वर्षातील अपवाद वगळता उद्योगाने आपली क्षमता बऱयापैकी दाखवली आहे. आर्थिक वर्षाच्या दुसऱया सहामाहीत मात्र निर्यातीत सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.
मागच्या आर्थिक वर्षादरम्यान पॉलिश हिऱयांची निर्यात ही 8.87 टक्क्यांनी घसरुन 1,20,302.04 कोटी रुपयावर राहिली आहे. जी मागच्या आर्थिक वर्षात 1,32,015.25 कोटी रुपयावर राहिली होती. आर्थिक वर्षाच्या दरम्यान सोन्याच्या दागिन्यांची निर्यात 57.89 टक्क्यांनी घटून 35,483.17 कोटी रुपयावर स्थिरावली आहे.
निर्यातीचा आकडा
दुसऱया बाजूला एकंदर दागिन्यांच्या निर्यातीत चांदीच्या दागिन्यांची निर्यात 43 टक्क्यांनी वाढून 17,163.03 कोटी रुपयावर राहिली आहे. तसेच रंगीत रत्नांची निर्यात 39.32 टक्क्यांनी घटून 1,377.30 कोटी रुपयावर राहिली आहे,