अथणी/प्रतिनिधी
माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात आरएसएसचे ज्येष्ठ नेते अरविंदराव देशपांडे यांच्या निवासस्थानी जाऊन शनिवारी त्यांची भेट घेतली. यावेळी जारकिहोळी यांनी सुमारे अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली.
शुक्रवारी म्हैसूर येथून परतल्यावर जारकिहोळी यांनी विधान केले की आपण आमदार म्हणून राजीनामा देणार परंतु भाजपमध्ये कायम राहू तसेच त्यांच्याविरोधात कट रचणाऱ्या पक्ष नेत्यांना धडा शिकवू, असे म्हंटले होते. तसेच जारकिहोळी यांनी, भाजप उच्च कमांड आणि आरएसएस नेत्यांनी त्यांना आदर दिला आहे. जारकिहोळी यांनी त्यांच्या पुढच्या राजकीय चाली व राजीनाम्यावर चर्चा केल्याचे अनुमान आहे. दरम्यान बैठकीसंदर्भात माध्यमांना कोणतेही विधान करण्यास त्यांनी नकार दिला.