मुलीवर गर्व असल्याची अभिनेत्रीची टिप्पणी
रविना टंडनची मुलगी रशाने मार्शल आर्ट्समधील प्रकार तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे. अभिनेत्रीने समाजमाध्यमांवर रश आणि तिच्या प्रमाणपत्रासोबतचे छायाचित्र प्रसारित करून आनंद व्यक्त केला आहे. रशा थडानी तुझ्यावर गर्व असल्याचे रविनाने नमूद केले आहे.
समाजमाध्यमांवर कौतुक
रविनाच्या छायाचित्रावर प्रतिक्रिया व्यक्त करत तिचे मित्र तसेच चाहत्यांनी रशाचे अभिनंदन केले आहे. सर्व मुलींनी स्वरक्षणासाठी मार्शल आर्ट्स शिकावे असे अभिनेता समीर सोनीने म्हटले आहे. तर एका समाजमाध्यम वापरकर्त्याने ‘आईसारखी मुलगी, अभिमानास्पद क्षण’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
15 वर्षीय रशा रविना टंडनने फेब्रुवारी 2004 मध्ये चित्रपट वितरक अनिल थडानी यांच्याशी विवाह केला होता. जुलै 2005 मध्ये या दांपत्याला कन्यारत्न प्राप्त झाले होते. मार्शल आर्टसह रशा मुष्टियुद्धाचेही प्रशिक्षण घेत आहे. जानेवारी 2019 मध्ये रविनाने समाजमाध्यमांवर रशाच्या मुष्टियुद्धाच्या प्रशिक्षणाची चित्रफित प्रसारित केली होती. याचबरोबर रविनाला 13 वर्षीय रणवीरवर्धन नावाचा मुलगा आहे. तसेच रविनाने विवाहापूर्वी 1995 मध्ये पूजा आणि छाया या मुलींना दत्तक घेतले होते.