प्रतिनिधी / बेळगाव
रविवारीही कोरोना रुग्णसंख्येने एक हजारचा आकडा पार केला असून गेल्या 24 तासात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 8 जणांचा समावेश आहे. मृतांत दोन महिलांचाही समावेश असून कोरोनामुक्त झालेल्या 723 जणांना विविध इस्पितळे व कोविड केअर सेंटरमधून घरी पाठविण्यात आले आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 57 हजार 99 झाली असून त्यापैकी 39,208 जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. अद्याप 17 हजार 449 सक्रिय रुग्ण आहेत. रविवारी कोरोनामुळे 13 जण दगावले आहेत. आतापर्यंतचा मृतांचा आकडा 442 वर पोहोचला आहे. अद्याप 2 हजार 948 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एका बेळगाव तालुक्मयातील 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गोकाक, अथणी, रायबाग तालुक्मयातील प्रत्येकी 1 व हुक्केरी तालुक्मयात दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बेळगाव पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मोडणारी 39 वाहने जप्त केली असून विनामास्क रस्त्यावर फिरणाऱया 132 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
रविवारी सांबरा एटीएसमधील आणखी 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गजपती, बेनकनहळ्ळी, अलतगा, कंग्राळी बीके, बडाल अंकलगी, बाळेकुंद्री बीके, देसूर, धामणे, बेकिनकेरे, संतिबस्तवाड, गणेशपूर, अष्टे, गुडगनट्टी, होनगा, बडस केएच, मुत्नाळ, जाफरवाडी, काकती, मच्छे, सांबरा, धामणे, यरमाळ, चंदूर, मुतगा, सुळेभावी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
बिम्स कॅम्पस, फुलबाग गल्ली, दरबार गल्ली, गांधीनगर, हनुमाननगर, गोंधळी गल्ली, टिळकवाडी, हनुमाननगर, हिंडाल्को कॉर्टर्स, हिंदवाडी, इंद्रप्रस्थनगर, जाधवनगर, कणबर्गी, कंग्राळ गल्ली, कुवेंपूनगर, लक्ष्मी टेकडी, महांतेशनगर, मजगाव, मार्कंडेयनगर, मार्केट यार्ड, मारुती गल्ली, महाद्वार रोड, नेहरूनगर, नार्वेकर गल्ली, न्यू गुड्सशेड रोड, पोलीस हेडक्वॉर्टर, रामतीर्थनगर, रुक्मिणीनगर, सदाशिवनगर, सहय़ाद्रीनगर, समादेवी गल्ली, शहापूर परिसरातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
अलारवाड, आनंदवाडी, अनगोळ, अंजनेयनगर, अशोकनगर, आझादनगर, बसवकॉलनी, बसवन कुडची, भाग्यनगर, टिळकवाडी, वडगाव, वैभवनगर, वीरभद्रनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी एका बेळगाव तालुक्मयात 342 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 125, शहर व उपनगरातील 227 जणांचा समावेश आहे.