क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कडोली येथे शिवाजी व्यायामशाळा व बलभिम व्यायामशाळा कडोली आयोजित गुढी पाडव्यानिमित्त भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान रविवार दि. 3 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे.
या कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती अस्लम काझी याचा पठ्ठा महाराष्ट्र कुर्डूवाडीचा मल्ल दादूमिया मौलानी व हरियाणा केसरी अमितकुमार यांच्यात होणार आहे. दुसऱया क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व गुरू हनुमान आखाडय़ाचा मल्ल मंजित दिल्ली यांच्यात, तिसऱया (अ) क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी नागराज बस्सीडोनी व उदय पाटील कंदूर यांच्यात तिसऱया (ब) क्रमांकाची कुस्ती सागर तांबखेडे कोल्हापूर व संगमेश बिराजदार बेळगाव, चौथ्या क्रमांकाची कुस्ती किर्तीकुमार कंग्राळी व विक्रम शिनोळी यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती रोहित ल. कंग्राळी वि. रोहित शिंदे कुंदूर पुणे यांच्यात, सहाव्या क्रमांकाची कुस्ती सुशांत ल. कंग्राळी वि. संतोष अथणी, सातव्या क्रमांक निरंजन येळ्ळूर व विक्रम कोल्हापूर, आठवा क्रमांक संकल्प ल. कंग्राळी व अजित भांदुरगल्ली, नववा क्रमांक प्रेम ल. कंग्राळी व किरण अष्टगी, दहावा क्रमांक प्रवीण निलजी वि. कुबेर पिरनवाडी यांच्यात होणार आहे. याशिवाय 50 हून अधिक लहान मोठय़ा कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी महिलांच्या दोन कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 1) स्वाती कडोली व प्रज्ञा ल. कंग्राळी तर 2) सानिका कडोली व अनुष्का अलारवाड यांच्यात खास लढती होणार आहेत. त्याशिवा मेंढय़ाची कुस्तीही आयोजित करण्यात आली आहे.