कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या वाढतीच
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शनिवारी 510 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. रविवारीही चार शतकांचा आकडा पार झाला असून 403 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर बेळगाव, हुक्केरी, चिकोडी तालुक्मयातील 7 जण दगावले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नव्या रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्मयातील 143 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरांतील 118 व ग्रामीण भागातील 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सिव्हिल हॉस्पिटलसह जिल्हय़ातील वेगवेगळय़ा इस्पितळांतून कोरोनामुक्त झालेल्या 223 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
बेळगाव शहर व उपनगरांमधील 3, हिरेबागेवाडी येथील 1, चिकोडी तालुक्मयातील 2 व हुक्केरी येथील 1 असे एकूण सात बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने तपासणी वाढविल्यामुळे साहजिकच रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या रविवारी 14,662 इतकी झाली आहे.
10,378 जणांची कोरोनावर मात
बरे होणाऱयांची संख्याही लक्षणीय आहे. आतापर्यंत 10,378 जणांनी कोरोनावर मात केली असून 4 हजार 073 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत 1 लाख 9 हजार 561 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 92 हजार 752 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
1130 अहवालांची प्रतीक्षा
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाला आणखी 1130 अहवालांची प्रतीक्षा आहे. 28 हजार 056 जण अद्याप होमकेअरमध्ये आहेत. यापैकी ज्यांना लक्षणे दिसून येतात, त्यांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱयांनी दिली.
बिम्स कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण
मच्छे येथील राज्य राखीव दलाच्या तीन जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बिम्स कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुतगा, हलगा-बस्तवाड, गणेशपूर, कल्लेहोळ, कडोली, सुळगा, मोदगा, पंतबाळेकुंद्री, सुळेभावी, हलगा, सांबरा, धामणे, बडाल अंकलगी, मण्णीकेरी परिसरात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
अनगोळ, महाद्वार रोड, सदाशिवनगर, वडगाव, श्रीनगर, शिवबसवनगर, महात्मा फुले रोड, मिरापूर गल्ली, अयोध्यानगर, हनुमाननगर, भाग्यनगर, फुलबाग गल्ली, राणी चन्नम्मानगर, मुचंडी, हिंडाल्को कॉलनी, रामतीर्थनगर, मुत्यानट्टी, मंडोळी, भेंडीगेरी, अशोकनगर, बुरुड गल्ली-बेळगाव, विजयनगर, कामत गल्ली, गौंडवाड, टिळकवाडी, सहय़ाद्रीनगर, टीव्ही सेंटर, महांतेशनगर, रुक्मिणीनगर, गुरुप्रसाद कॉलनी, मजगाव, येळ्ळूर रोड, बसव कॉलनी, शास्त्राrनगर, जाधवनगर, सुभाषनगर, संगमेश्वरनगर, चव्हाट गल्ली, रामदेव गल्ली परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.