वृत्तसंस्था/ हॅम्बुर्ग
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या हॅम्बुर्ग खुल्या युरोपियन पुरूषांच्यआंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्रे रूबलेव्हने एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात रूबलेव्हने ग्रीसच्या सिटसिपेसचा 6-4, 3-6, 7-5 असा पराभव केला. आता या स्पर्धेनंतर रूबलेव्ह आणि सिटसिपेस पॅरीसमधील प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत दाखल झाले आहेत. 2020 च्या टेनिस हंगामातील 14 व्या मानांकित रूबलेव्हचा हा 25 वा विजयी सामना आहे.