युक्रेनच्या महिलेने दाखविले साहस : स्वतः झाली गंभीर जखमी
युक्रेनील एका मायलेकीचे छायाचित्र व्हायरल होतेय. या छायाचित्रात युक्रेन आणि रशियाच्या युद्धादरम्यान एक महिला स्वतःच्या मुलीला वाचविताना दिसून येते. ही महिला अत्यंत गंभीर जखमी झाली तरीही तिने स्वतःची मुलगी क्हिक्टोरियाला कुठलेच नुकसान होऊ दिलेले नाही.
व्हायरल छायाचित्र 27 वर्षीय युक्रेनियन महिला ओल्गा यांचे असून त्या स्वतःच्या मुलीला विस्फोटातून वाचविताना स्वतः गंभीर जखमी झाल्या. ती घटना एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हीत. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पूर्ण खोलीत काचांचा खच पडला होता. मी माझ्या मुलीला रक्ताच्या थारोळय़ात पाहिले, माझ्या कपाळावर जखमी झाली होती आणि रक्त वाहू लागले होते. माझे रक्त मुलीच्या शरीरावर पडत होते. परंतु मला प्रथमदर्शनी हे तिचेच रक्त असल्याचे वाटले होते असे ओल्गा यांनी म्हटले आहे. ओल्गा यांच्यावर ओखमतदित रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माझ्या डोक्याला खोलवर जखमी झाली होती. मी माझ्या 6 आठवडय़ांच्या मुलीला ब्लँकेट ओढून झोपविले होते. तेव्हाच क्षेपणास्त्र हल्ला सुरु झाला. एक क्षेपणास्त्र आमच्या घरावरच आदळले. या हल्ल्यात सुदैवाने मुलीला कुठलीच ईजा झालेली नसल्याचे ओल्गा म्हणाल्या.