बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात लाभार्थ्यांचे कोरोना लसीकरण सुरु आहे. प्रथम ज्यांचे दुसरे डोस राहिले आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु झाले असून कर्नाटक सरकारने आता रस्त्यावरील विक्रेत्यांना आणि मेट्रो बांधकाम कामगारांना आजपासून प्रायोगिक आधारावर लसीकरण केलं जाणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा हे गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रीय महाविद्यालयाच्या मैदानावर रस्त्यावरील विक्रेत्यांना आणि मेट्रो बांधकाम कामगारांसाठी लसीकरण अभियान सुरू करणार आहेत.
बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) च्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मेट्रो बांधकाम कामगारांनाही लस देण्यात येणार आहे. मेट्रो बांधकाम कामगारांना सरकारने नुकताच फ्रंट लाइन कामगारांचा दर्जा दिला आहे.