लोकांनी पळविल्या बाटल्या, आंध्रप्रदेशातील घटना
वृत्तसंस्था/ शाखापट्टणम
मद्यपींकरता मोफत मद्यापेक्षा अधिक मोठी ‘गिफ्ट’ काय असू शकते? आंध्रप्रदेशात बियरने भरलेला एक ट्रक उलटला आहे. आंध्रप्रदेशच्या अनकालपल्ली जिल्ह्यात बियरचे जवळपास 200 कार्टन घेऊन जाणारा ट्रक उलटला. या घटनेनंतर परिसरातील लोकांनी दुर्घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेल्या बियरच्या बाटल्या पळविल्या आहेत.
या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात लोकांना बियरच्या बाटल्या पळविताना पाहिले जाऊ शकते. बियरच्या बाटल्या पळविण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ दिसून आल्याने महामार्गावरील वाहतूक काही वेळ प्रभावित झाली.
राष्ट्रीय महामार्गावर अनाकापल्ली आणि बय्यावरम दरम्यान ही घटना घडली आहे. बियरच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक रस्त्यावर उलटताच काही लोकांनी बियरच्या बाटल्या पळविल्या आहेत. ट्रकचालक आणि क्लीनरला मदत करण्याऐवजी ट्रकमधील बियरच्या बाटल्या लुटण्यातच ते व्यस्त होते असे या व्हिडिओत दिसून येते.