शाहूपुरी पोलिसांची कारवाई : दोन दुचाकी जप्त
प्रतिनिधी/ सातारा
सध्या रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याचे फॅड युवापिढीत रुजत असून अनेक वेळा कारवाई करुन काही युवकांच्यात सुधारणा होत नाही. एकीकडे कोरोना थैमान घालत असून देखील मोळाचा ओढा परिसरातील रस्त्यावर असलेल्या अमर गॅरेजसमोर रात्री 8 च्या सुमारास काही युवक हुल्लडबाजी करत वाढदिवस साजरा करत होते. याप्रकरणी बर्थ बॉसह पाचजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहित अशी, दि. 3 रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. यावेळी रात्री 8 च्या सुमारास मोळाचा ओढा सातारा रोड ते शाहुपूरी पोलीस स्टेशनचे येथील रोडवर अमर गॅरेज समोर काही मुले दुचाकीवर केक कापून वाढदिवस साजरा करत होते. सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवण्यास बंदी असताना देखील ते नियमाचा भंग करत होते.
पोलीस गाडी आल्यावर हे सर्व युवक तेथून पळून गेले. मात्र त्यांच्या ताब्यातील दुचाकी तिथेच होत्या. या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. या ठिकाणी अक्षय मनोहर लोहार (वय 25 रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) या बर्थडे बॉयसह किशोर सूर्यकांत सूर्यवंशी (वय 31 रा. आकाशवाणी झोपडपट्टी), आकाश संतोष पाटोळे (वय 18, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांच्यासह व तर पाच ते सहा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.